Breaking News

दुचाकी वाहनांसह सोन्याची चैन चोरणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या...

दुचाकी वाहनांसह सोन्याची चैन चोरणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या...

पनवेल : पनवेल शहर व खोपोली परिसरात दुचाकी वाहनांसह सोन्याची चैन चोरणाऱ्या गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.  त्यानंतर अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस येणार असल्याचे समोर येत आहे. 

पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील डोंबाळा कॉलेज येथील शिव मंदिर जवळ, एका इसमाला तीन व्यक्तीने मारहाण करून पैसे, घड्याळ आणि इतर मौल्यवान वस्तू काढून घेतल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली  पो. उप.नि. अभयसिंह शिंदे,पोहवा परेश म्हात्रे, पो हवा वाघमारे. पो हवा महेंद्र वायकर, पोना रवींद्र पारधी, पोना मेथे, पोशि प्रसाद घरत.पोशि कांबळे आदींच्या पथकाने गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून  गुप्त बातमीदारांकडून आरोपींची माहिती काढुन सदर गुन्ह्यांतील फरार मुख्य आरोपी विकास जयस्वाल वय २२ वर्ष हा सदर गुन्हा घडल्यापासून ते आज आपले अस्तित्व लपवण्यासाठी चेन्नई राज्य तामिळनाडू तसेच वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत असल्याबाबत तांत्रिक तपासाद्वारे समजले होते. सदर आरोपी हा पनवेल येथे येत असल्याची गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाल्याने सदर आरोपीला पनवेल परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले असता तसेच त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने पनवेल व खोपोली परिसरात चोरलेली सोन्याची चैन, एक्टिवा स्कुटी, होंडा मोटर सायकल, होंडा शाईन मोटरसायकल बाबतची माहिती दिली व हे सर्व गुन्हे त्यांनी केले असल्याची कबुली देऊन मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे .


Most Popular News of this Week