Breaking News

नवरात्र उत्सव शांततेत व आनंदमय वातावरणात साजरा करा : वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.शत्रुघ्न माळी

नवरात्र उत्सव शांततेत व आनंदमय वातावरणात साजरा करा : वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.शत्रुघ्न माळी

रसायनी : काही दिवसांवर येऊन ठेपलेला महाराष्ट्रातील पवित्र असा नवरात्र उत्सव विजयादशमी (दसरा) सण मोठ्या भक्तीभावाने शांततापूर्वक व आनंदमय वातावरणात साजरा करा असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.शत्रुघ्न माळी यांनी रसायनी पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना व उपस्थित असलेल्या नागरिकांना केले.

  मंगळवार (दि.१०) रोजी रसायनी पोलीस ठाण्यात नवरात्र उत्सवानिमित्त रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी परिसरातील सर्व पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

  या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.शत्रुघ्न माळी म्हणाले की, ज्याप्रमाणे दहीहंडी उत्सव,(गोपाळकाला) गणेश उत्सव,मुस्लिम धर्मियांचा ईद-ए-मिलाद हे सण उत्सव शांततापूर्ण व आनंदमय वातावरणात पार पडले त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवही अशाच शांततापूर्ण व आनंदमय आणि भक्तीभावाने साजरा व्हावा अशी अपेक्षा श्री.माळी यांनी तमाम रसायनी वासियांकडून व्यक्त केली.

यापुढे बोलताना श्री.माळी म्हणाले की, नवरात्रोत्सव दरम्यान  महाराष्ट्रात ठीकठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्रसह रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आचारसंहिता सुरू आहे.त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या आचारसंहितेचे भंग होणार नाही याची दक्षता घेणं हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.हा उत्सव साजरा करत असतांना मंडळाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी मध्येच राजकारण आणू नये. किंवा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाला कुठल्याही प्रकारचे राजकीय स्वरूप देऊ नये.आचारसंहिता असल्याने राजकीय पुढाऱ्यांचे बॅनर तसेच कुणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असे बॅनर कोणीही लावू नये असा सल्लाही श्री.माळी यांनी यावेळी उपस्थितांना दिला. नवरात्रोत्सव दरम्यान दिलेल्या सूचनांचे  व कायद्याचे काटेकोरपणे ज्यांनी पालन केले नाही अशा मंडळावर आणि व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जर दिलेल्या नियम आणि सूचनांचे पालन केले नाही तर पुढच्या वर्षी त्या मंडळाला परवानगी नाकारली जाईल. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ए.बी.घरबुडे श्री.आर.टी.सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक श्री.बी.बी. माम्हुनकर,श्री.महेश धोंडे, गोपनीय शाखेचे श्री.राहुल भडाळे व पोलीस कर्मचारी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी गांव पोलीस पाटील, महिला पदाधिकारी व पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week