Breaking News

गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलच्या पथकाने डिलेव्हरी बॉय ला लुटणाऱ्या चोराला केले गजाआड

गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलच्या पथकाने डिलेव्हरी बॉय ला लुटणाऱ्या चोराला केले गजाआड

पनवेल :  कामोठे सेक्टर ३६ येथे अमेझोनमध्ये डीलेवरी बॉयच्या गाडीसह १९ पार्सल एका अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. या चोराला गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलच्या पथकाने ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे.  कामोठे सेक्टर सेक्टर ३६, प्लॉट नं. २० शिवसंकल्प बिल्डींगचे गेटच्या बाहेरील बाजूस रविंद्र शिवराम शेटटी (वय ४४ वर्षे) या अमेझॉन डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. त्यावेळी अज्ञात चोरटयाने त्यांच्या गाडीसह १९ पार्सल चोरुन नेली. यामध्ये २८,९९९ रुपये कीमंतीचा वन प्लस नॉर्ड मोबाईल यासह इतर सामान ज्याची किंमत सुमारे ५० हजार ५३६ रुपये आहे यांचा समावेश होता. या चोरीच्या ग्नतेची तक्रार दाखल होताच गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे वपोनी उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी, पोहवा अजित पाटील, पोहवा इंद्रजीत कानू, पोहवा रमेश शिंदे, पोना आदिनाथ फुंडे आणि पोशी विक्रांत माळी आदींच्या पथकाने पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपी प्रेम घाडगे रा उलवे याला उलवे येथून ताब्यात घेऊन त्याच्या कडे अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. व त्याने गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल पोलीस पथकाने हस्तगत केला आहे. या गुन्ह्याची नोंद कामोठे पोल्सी ठाण्यात करण्यात आली आहे.


Most Popular News of this Week