Breaking News

एक्सलेटर जिन्याच्या खाली आढळला इसमाचा मृतदेह

एक्सलेटर जिन्याच्या खाली आढळला इसमाचा मृतदेह

पनवेल : पनवेल रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ६/७ च्या एक्सलेटर जिन्याच्या खाली एका इसमाचा इसमाचा मृतदेह आढळला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय ३६ वर्षे, उंची ५ फूट ५ इंच, अंगाने सडपातळ, रंग काळा सावळा, डोक्याचे केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, चेहरा उभट, दाढी वाढलेली असून डाव्या हातावर गोंदलेले आहे  उजव्या हातावर ॐ असे गोंदलेले आहे. त्याचच प्रमाणे त्याच्या अंगात निळ्या व राखाडी रंगाची सॅंडो बनियान, फिकट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व आतमध्ये जांभळ्या रंगाची लक्क्स  कोझी अंडरवेअर घातलेली आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल रेल्वे पोलीस ठाणे फोन नंबर ०२२-२७४६७१२२ किंवा सहा पोलीस निरीक्षक बी.व्ही.दोडमिसे यांच्याशी संपर्क साधावा.


Most Popular News of this Week