Breaking News

नमुंमपा वर्धापन दिनी अधिकारी, कर्मचारी यांचा विविध स्पर्धांमध्ये उत्साही सहभाग - गुणवंतांचा गौरव , कोव्हीड कालावधीनंतर २ वर्षांनी नमुंमपा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

नमुंमपा वर्धापन दिनी अधिकारी, कर्मचारी यांचा विविध स्पर्धांमध्ये उत्साही सहभाग - गुणवंतांचा गौरव , कोव्हीड कालावधीनंतर २ वर्षांनी नमुंमपा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षी अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या अंगभूत कला-क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. कोव्हीड प्रभावीत कालावधीनंतर २ वर्षांनी एकत्रित येऊन साजरा केला जाणारा यावर्षीचा वर्धापन दिन महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फुर्त सहभाग घेत जल्लोषात साजरा केला.नवी मुंबई महानगरपालिकेचा विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या ३१ व्या वर्धापनदिन समारंभात अधिकारी, कर्मचारीवृंदाने गीत, नृत्य तसेच इतर कलाविष्कार सादर करीत अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन केले. 

                यामधील सर्वोत्कृष्ट कलाविष्कारांना मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, प्रशासन विभागाचे उप आयुक्त नितीन नार्वेकर, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा विभागाचे उप आयुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ १ विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परवाना विभागाचे उप आयुक्त डॉ. श्रीराम पवार, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत तायडे, विभाग अधिकारी दत्तात्रय घनवट, महेंद्र सप्रे, प्रशांत गावडे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावर्षी महिलांकरिता ‘होम मिनिस्टर’ ही विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये १७५ महिला कर्मचा-यांनी सहभाग घेतला. त्यामधून सुनिता विर, मनिषा नारकर, चारुलता शिंदे, हेमलता म्हात्रे, प्रतिक्षा पाटील या टॉप ५ विजेत्यांना बक्षीस स्वरुपात पैठणी प्रदान करण्यात आली.वैयक्तिक गायन स्पर्धेत प्रियांका कटके, गणेश देशमुख, वासंती पाटील यांनी अनुक्रमे ३ पारितोषिके पटकाविली.संतोष नाईक व स्वाती अमृते उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले.वैयक्तिक नृत्य स्पर्धेत मयुरी ठोंबरे यांनी प्रथम तसेच स्मिता पाटील व रेश्मा राऊत यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांकाचे आणि ऋतीका बागुल व सुरेखा गायकवाड यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके संपादन केली.समुह गायनामध्ये वाशी सार्वजनिक रुग्णालयातील रक्तपेढी कर्मचारी समुह यांनी प्रथम क्रमांकाचे तर शिक्षण विभागाने व्दितीय आणि माता बाल रुग्णालय बेलापूर समुहाने तृतीय क्रमांक संपादन केला.समुहनृत्य स्पर्धेत ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र वाशी यांनी प्रथम पारितोषिक आणि रवी जाधव नृत्य समुह यांनी व्दितीय व संपदा रेपाळे नृत्य समूह यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. समाजविकास ग्रंथालय विभाग नृत्यसमुह व शाळा क्र.४५ सम्राटनगर तळवली शिक्षकसमुह यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित कऱण्यात आले.एकपात्री नाट्य, नकला, वादन, कविता वाचन अशा वैयक्तिक कलाविष्कारामध्ये नारायण लांडगे प्रथम क्रमांकाचे तसेच पुष्पांजली कर्वे व्दितीय व शारदा बनसोडे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. अरविंद उरसळ आणि निखिल धावटे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविली. शिक्षण विभागाने सादर केलेल्या नाटिकेस विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.कला स्पर्धांप्रमाणेच मागील आठवडाभरात अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यासाठी क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, कॅरम, बुध्दीबळ, धावणे, लांब उडी, गोळा फेक अशा मैदानी व बैठ्या खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे महिला कर्मचा-यांकरिता रांगोळी, पाककला, संगीत खुर्ची आणि होम मिनिस्टर धर्तीवर ‘खेळ पैठणीचा’ या विशेष स्पर्धांचे आयोजन कऱण्यात आले होते.पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी ३८ संघांमधून कोपरखैरणे विभाग कार्यलयाचा संघ विजेता व अग्निशमन विभागाचा संघ उपविजेता चषकाचा मानकरी ठरला. यामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून अजय पाटील (कोपरखैरणे विभाग कार्यालय), उत्कृष्ट गोलंदाज  म्हणून हरदेव तांडेल (अग्निशमन विभाग) व मालिकावीर म्हणून विजेंद्र कोळी (कोपरखैरणे विभाग कार्यालय) यांना वैयक्तिक पारितोषिके प्रदान कऱण्यात आली.महिलांच्या १० संघांमध्ये झालेल्या क्रिक्रेट स्पर्धेत शिक्षण विभागाचा संघ विजेता व ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राचा संघ उपविजेता ठरला. यामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रतिभा गोलहार (शिक्षण विभाग मुख्यालय), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विद्या कदम (ईटीसी) आणि मालिकावीर म्हणून समिक्षा तांबोळी (शिक्षण विभाग मुख्यालय) यांना वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरिवण्यात आले.कंत्राटी कर्मचा-यांच्या क्रिकेट स्पर्धेत १२ संघांमधून विद्युत विभागाचा संघ विजेतेपदाचा आणि सार्वजनिक रुग्णालय वाशीचा संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. यामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून रणजीत जाधव (विद्युत विभाग), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जितेश कांबळे (वाशी विभाग) व मालिकावीर म्हणून अनिकेत पाटील (विद्युत विभाग) यांना वैयक्तिक पारितोषिकांनी सन्मानीत करण्यात आले.पुरुषांच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत ६ संघांमधून अग्निशमन दल कोपरखैरणे विजेते तसेच लेखा विभाग उपविजेते पदाचे मानकरी ठरले.महिलांच्या थ्रो बॉल स्पर्धेत ६ संघांमधून लेखा विभागाचा संघ विजेतेपदाचा आणि ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण विभागाचा संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला.पुरुषांच्या कॅरम स्पर्धेत ११४ स्पर्धकांमधून साहेबराव गायकवाड प्रथम तसेच विनायक शिंदे व्दितीय व गणेश उपरे तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले.महिलांच्या कॅरम स्पर्धेत ३० स्पर्धकांमधून मनिषा पवार प्रथम, स्वाती अमृते व्दितीय आणि नेहा चव्हाण तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले.पुरुषांच्या बुध्दीबळ स्पर्धेत २५ स्पर्धकांमधून मंगेश काठोळे प्रथम क्रमांकाचे विजेते झाले तसेच विलास मलुष्टे आणि अमित मालगावकर यांनी अनुक्रमे व्दितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके पटकाविली.महिलांच्या बुद्धीबळ स्पर्धेत १६ स्पर्धकांमधून वर्षा गायकवाड यांनी प्रथम, सुहासी गरुडे यांनी व्दितीय व श्वेता उगलमुगले यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले.१०० मीटर धावणे स्पर्धेत आकाश नलावडे, गजानन कायंदे व मनोज चव्हाण अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.४० वर्षाखालील महिलांच्या ५० मीटर धावणे स्पर्धेत नेहा ठाकूर, अनुश्री खांडेभरड व रेणुका म्हात्रे तसेच ४० वर्षावरील महिलांच्या ५० मीटर धावणे स्पर्धेत कांचन माळी, अश्विनी गवते, दिपमाला सिंग अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे विजते ठरले.पुरुषांच्या लांब उडीत आकाश नलावडे, एकनाथ खेडकर, संदीप सिंह तसेच महिलांच्या लांब उडी स्पर्धेत नेहा ठाकूर, अश्विनी गवते व अंकीता धराडे हे अनुक्रमे तीन क्रमांकाचे मानकरी ठरले.गोळाफेक स्पर्धेत पुरुष गटात मनोज चव्हाण, गजानन कायंदे, सागर पाटील यांनी त्याचप्रमाणे महिला गटात कल्पना शिंदे, कार्तिकी वाडकर, सिमा विश्वे यांनी अनुक्रमे तीन क्रमांकाची पारितोषिके पटकाविली.महिलांसाठीच्या विशेष स्पर्धांमधील पाककला स्पर्धेत सुचिता गीध, सुहासी गरुडे, निता रांजणे त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धेत स्नेहल कोदे, सुविज्ञा पाटील व वैशाली मार्के यांनी अनुक्रमे तीन क्रमांकाची पारितोषिके पटकाविली.संगीत खुर्ची स्पर्धेत कल्पना गोसावी प्रथम क्रमांकाच्या व स्मिता चौलकर व्दितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.महानगरपालिकेच्या दैनंदिन कामातून काहीसा वेळ काढून अधिकारी, कर्मचारी शारीरिक व मानसिक ताणतणावापासून मुक्त रहावेत आणि त्यासोबतच त्यांच्यामधील गुणांनाही वाव मिळावा यादृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या सर्व स्पर्धांना व वर्धापन दिनातील सांस्कृतिक सादरीकरणाला अत्यंत उत्साही सहभाग मिळाला.नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापन दिनांमध्ये सतत २५ वर्षे समुहनृत्य सादर करणा-या नृत्यसमुहाचे प्रमुख रवी जाधव यांचा रौप्यमहोत्सवी सादरीकरणानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे स्पर्धांचे परीक्षक प्रा. आदित्य जोशी व प्रा. हर्षल अठ्ठणीकर (पाककला स्पर्धा), श्रीहरी पवळे (रांगोळी), रुपाली वराडकर व महेंद्र शिवशरण (गीत, नृत्य व कलाविष्कार स्पर्धा) यांनाही सन्मानीत करण्यात आले.या उपक्रम आयोजनात क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांच्यासह क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव तसेच सर्वश्री रवी जाधव, विलास कांबळे, अरविंद उरसळ, गिरीश चावरे, संतोष मळेकर, अभिजीत काटकर यांनी त्याचप्रमाणे महिलांच्या उपक्रम आयोजनात महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, उपआयुक्त मंगला माळवे, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, आदिती कुवेसकर, मनिषा ठाकूर, गायत्री चौधरी, विद्या कदम, प्रतिक्षा बिलकुले, कल्पना गोसावी, संजीवनी मिसळे, मनिषा कदम, अस्मिता कोंडाळकर यांनी विशेष योगदान दिले. 


Most Popular News of this Week