Breaking News

घोटाळेबाज अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून करोडो रुपयांचा मुख्य घोटाळा दाबण्याचा प्रयत्न ?, स्वछ सर्वेक्षणच्या नावाखाली झालेल्या घोटाळ्याचा प्रश्न कायम ?, हत्ती गेला पण शेपूट अडकले ची नवी मुंबईकरांना प्रचिती

घोटाळेबाज अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून करोडो रुपयांचा मुख्य घोटाळा दाबण्याचा प्रयत्न ?, स्वछ सर्वेक्षणच्या नावाखाली झालेल्या घोटाळ्याचा प्रश्न कायम ?, हत्ती गेला पण शेपूट अडकले ची नवी मुंबईकरांना प्रचिती

नवी मुंबई :- स्वछ सर्वेक्षणाच्या नावाखाली करोडो रुपयांची डाळ शिजवणाऱ्या नवी मुंबई मनपा टी.बी.आर विभागातील २० करोड रुपयांहून अधिक रकमेच्या झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे व उप अभियंता निलेश मोरे यांना तत्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे समाजसेवक योगेश महाजन यांच्याकडून करण्यात आली होती.त्यावेळी चौकशी अथवा निलंबन न करता आयुक्तांनी उप अभियंता निलेश मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांची उचलबांगडी केल्याने झालेल्या घोटाळ्याचे व निलंबनाचे काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.

                      या प्रकरणी महाजन यांनी गुरुवारी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली असता वरील प्रश्न उपस्थित केला.यावेळी आयुक्तांशी बोलतांना त्यांनी स्पष्ट केले कि घोटाळा प्रकरणात सोनावणे व मोरे यांची बदली न करता चौकशी करून निलंबन करण्यात यावे.काही दिवसांपूर्वी प्रशासनाने अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असत्या त्यात मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या.व त्या ठिकाणी नगराळे व तुंगार यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नंतर दोघांनीही गुरुवार पर्यत पदभार स्वीकारला नसल्याची माहिती महाजन यांनी आयुक्ताना दिली. त्यावर चौकशीच्या सूचना आयुक्तांनी मात्र प्रशासनाला दिल्या.नगरारे व तुंगार यांनी पदभार स्वीकारला नसल्याचा फायदा घेऊन मोरे यांच्या सहकाऱ्यांनी टी.बी.आर विभागात जाऊन मर्जीतील कंत्राट दारांच्या फायली कश्या पूर्ण करता येईल याचा प्रयत्न सुरु ठेवला.याचा पाठपुरावा घेतला असता घोटाळ्याची रक्कम मिळवण्यासाठी मोरे सह संपूर्ण टी.बी.आर विभागाचं दावणीला बांधला गेल्याचे दिसून आले.याच विभागाच्या माध्यमातून महापे अंडरपास रस्त्याचे बिनाटेण्डर काम यासह तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली अश्या पाच रेल्वे स्टेशनवर करण्यात आलेली रंगरंगोटीची कामे आहेत.ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी ३०,६५,४५२/- रुपयांचे टेंडर, तुर्भे रेल्वे स्टेशन परिसरातील कामाचे  २९,१४,९७२ /- रुपयांचे टेंडर, घणसोली रेल्वे स्टेशन परिसरातील २५,९७,९७६ /- रुपयांचे कामाचे टेंडर, तर कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरातील ३०,६५,४५२ /- रुपयांचे टेंडर काढण्यात आले असल्याची माहिती आयुक्तांना देण्यात आले आहे.यासह अनेक ठिकाणी न झालेल्या कामाचे टेंडर,निकृष्ट दर्जाच्या कामांचे टेंडर काढण्यात आल्याने चौकशी झाली तर मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर येईल अशी शक्यता महाजन यांनी व्यक्त केली आहे.स्वछ सर्वेक्षणाच्या एका विभागात २० करोड रुपयांहून अधिक रकमेचा घोटाळा झाला असेल तर इतर विभागात किती असेल तोही २०० कोटींच्या घरात जाईल असे मत व्यक्त करण्यात येत आहे.


Most Popular News of this Week