Breaking News

शिवसेनेचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यातील पीडित तरुण न्यायाच्या प्रतीक्षेत, पी.डब्ल्यू.खात्यात नोकरी देतो सांगून शेकडो जणांची फसवणूक, अनेकांचे परिवार उध्वस्त, स्वतंत्र खासगी पीडब्ल्यूडी वेब मॅनेजमेंट कार्यालय सुरु करून शासनाचीही फसवणूक

शिवसेनेचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यातील पीडित तरुण न्यायाच्या प्रतीक्षेत, पी.डब्ल्यू.खात्यात नोकरी देतो सांगून शेकडो जणांची फसवणूक, अनेकांचे परिवार उध्वस्त, स्वतंत्र खासगी पीडब्ल्यूडी वेब मॅनेजमेंट कार्यालय सुरु करून शासनाचीही फसवणूक

शिवसेनेचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यातील पीडित तरुण न्यायाच्या प्रतीक्षेत
पी.डब्ल्यू.खात्यात नोकरी देतो सांगून शेकडो जणांची फसवणूक, अनेकांचे परिवार उध्वस्त
स्वतंत्र खासगी पीडब्ल्यूडी वेब मॅनेजमेंट कार्यालय सुरु करून शासनाचीही फसवणूक

नाशिक (रेणुका गायकवाड - महाले) :- नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना नेते दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यातील फसवणूक झालेले शेकडो तरुण, तरुणी गेल्या अनेक वर्षांपासून आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असून न्याय मिळणार कधी असा प्रश्न त्यांना पडला आहे.स्वतंत्र खासगी पीडब्ल्यूडी वेब मॅनेजमेंट कडून त्यांची फसवणूक करण्यात आली असून आजही शेकडो जण न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.यातच अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून शिंदे - फडणवीस सरकार आमच्याकडे लक्ष देतील का असा प्रश्न आता तरुण - तरुणींना पडला आहे.शासनाच्या नावाखाली आमची फसवणूक झाली असून शासनही का गप्प आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.लाखो रुपये घेऊन कामांचे व कंत्राटाचे आमिष दाखवले गेले आणि काही वर्षातच भामट्यांनी पळ काढल्याने गेलेली रक्कम परत मिळवायची कशी याची चिंता आता पीडित तरुण - तरुणींना लागली आहे.
                  सन २०१० - ११ दरम्यान मालेगाव येथे राहणारे भूषण शेवाळे यांनी मालेगाव स्टेट बँक शेजारी वेब मॅनेजमेंट कंपनी नावाने एक छोटे खाणी कार्यालय सुरु केले.त्यानंतर परिचयातील एजंट व मित्रपरिवार यांच्या मार्फत मालेगाव व आजूबाजूच्या जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना गाठत व खासगी पीडब्ल्यूडी वेब मॅनेजमेंट कार्यालयात नोकर भरती होत आहे,येथे सरकारी परमनंट जॉब मिळतो अशा प्रकारचे प्रचार व प्रसार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रचाराला भुलून अनेकांनी कामासाठी कार्यालय गाठत कामाला सुरवातही केली.नव्यानेच जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीचे काही दिवस पगारवाटपही करण्यात आला.ज्यामुळे इतरांमध्ये विश्वास निर्माण झाला, अनेक कुटुंबांनी आपले संपूर्ण आयुष्याची जमापुंजी ,सोने, जमिनी, घर विकून जमा पैसे यांना दिले, इतकेच नव्हे तर अनेक निवृत्त शिक्षक, पोलीस अधिकारी, व सरकारी कर्मचारी यांनी मुलांसाठी निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसेही इथे भरलेत,अल्पावधीतच मालेगाव व आजूबाजूच्या परिसरामध्ये भूषण शेवाळे, ललित शेवाळे,शेखर बागुल, दिनेश अहिरे ही चौकडी पीडब्ल्यूडी चे मोठे साहेब म्हणून प्रसिद्धी मिळवायला लागले.अनेक होतकरू तरुण नोकरीसाठी त्यांच्या ऑफिसला जाऊ लागले.अचानक भरमसाठ रक्कम मिळू लागल्याने  मालेगाव व इतर परिसरामध्ये स्वतःच्या व जवळच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या नावाने वरील चौकडीने संपत्ती खरेदी करण्यास सुरुवात केली. दोन वर्षातच चौकडी लाखोंच्या  गाड्यांमध्ये फिरू लागले.२०१० - ११ ला सुरुवात केल्यानंतर अल्पावधीतच भूषण शेवाळे व ललित शेवाळे यांनी करोडो रुपये खर्च करून तीन मजली आलिशान ऑफिसही बांधले व या ऑफिस मधूनच पुढील भरती घोटाळा चालवला गेला.नोकरी अथवा टेंडर देतो म्हणून जॉईन झालेल्या मुलांना अनेक दिवस झाले परंतु काही कामच दिले जात नव्हते.सुरुवातीचे एक दोन महिने पगार दिल्यानंतर पगार मिळणे ही बंद झाले या संदर्भात विचारले असता सर्वांनाच उडवा उडवी चे उत्तर मिळू लागले आपली फसवणूक तर झाली नसेल ना ? अशा शंकांनी ग्रस्त तरुणांनी अखेर चौकडीकडे स्पष्टीकरण मागितले असता शासकीय नियुक्तीपत्र खोटे आहे काय ?,पीडब्ल्यूडीचे मुख्य सचिव शामकुमार मुखर्जी व सचिव डेकाटे यांच्या सह्या खोटे आहे काय ? आम्ही जर फ्रॉड केले असते तर इतके मोठे ऑफिस खोलून बसलो असतो का ?, अशा प्रकारचे उत्तरे देऊन तोंडे गप्प केले गेले.परंतु यातील काही हुशार तरुणांनी वेगवेगळ्या माध्यमांतून सदर नियुक्ती पत्रांचा तपास करण्यास सुरुवात केला.पीडब्ल्यूडी विभागाच्या नाशिक व मुंबई येथील विभागांना संपर्क करून माहिती घेण्यास सुरुवात केली.तेव्हा अनेकांच्या असे लक्षात आले की भूषण शेवाळे हे कोणत्याही प्रकारे पीडब्ल्यूडी या खात्याची संबंधित नाही.  पीडब्ल्यूडी खात्याचे त्यांच्याशी नोकरी अथवा जेसीबी व इतर टेंडर संदर्भात कोणतेही शासकीय करार झालेले नाहीत. ज्या तरुणांना यासंदर्भात कळाले त्यांनी इतरांना कल्पना दिली व अनेक तरुणांचे समूह नव्यानेच थाटलेल्या तीन मजली ऑफिसमध्ये चकरा मारू लागले अनेकांनी आम्हाला नोकरी नको आम्हाला आमचे पैसे परत हवे म्हणून तगादा लावण्यास सुरुवात केली.त्यावेळी थातुर- मातुर कारणे देऊन वेळ मारून नेण्यात आली परंतु जसे जसे झालेल्या फसवणुकीचा प्रचार होण्यास सुरुवात तसे वरील सगळ्यांनी पळ काढला.त्यानंतर पिडीतांनी मालेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली असता 420, 419, 463, 465, 467, 470, 471, 472, 473, 475,170,177,182,211,120 (ब), व महाराष्ट्र ठेवीदारांचा हितसंबंधी कलम 3 व 4 कायदा 1999, आयटीआय कलम 66 (C) व (D) कलमांचा समावेश करत गुन्हा दाखल करण्यात आला.सदरील प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन व गोरगरिबांच्या मुलांना लवकर न्याय मिळावा म्हणून तत्कालीन डी वाय एस पी गजानन राजमाने यांनी स्वतः या बहुचर्चित प्रकरणाचा तपास पूर्ण करून ९० दिवसाच्या आत न्यायालयात चार्जशीट दाखल केले. अटक झालेल्या आरोपींपैकी भूषण शेवाळे, ललित शेवाळे,शेखर बागुल हे प्रत्येकी सात वर्ष व दिनेश आहेर एक वर्ष अटकेत होते,सध्या सर्व आरोपी जामिनावर बाहेर असून साक्षीदारांना दबावत घेऊन सदर न्यायालयीन प्रकरण प्रभावित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चर्चेत आहे. मध्यस्थी लोक मित्र, नातेवाईक असूनही प्रामाणिक नसल्यामुळेच आमची फसवणूक झाली याचे तरुण व त्यांच्या कुटुंबीयांवर खोलवर आघात झाले.इतर मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये चेष्टेचा विषय झाल्यामुळे अनेक जण मानसिक तणावात गेले, घरदार विकून दिलेले पैसे तर बुडालेतच पण नोकरीही मिळाले नाही यामुळे अनेकांची लग्न मोडलेत , डझनभर मुलांचे घटस्फोटही झालेत यापैकी अनेकांनी वैतागून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ही उचलले होते, काही तरुण तर कायमस्वरूपी आपले मूळ गाव सोडून देशोधडीला लागलेत, यापैकी अनेक कुटुंबांनी असे आरोप केले आहेत  मध्यस्थी लोक आमचे नातेवाईक होते म्हणून विश्वासाने आम्ही त्यांचे ऐकून पैसे दिले व फसले गेलो, परंतु जेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला तेव्हा मध्यस्थ्यांनी हात वर केले, मध्यस्थी इसमांना याची कल्पना असूनही त्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रत्येक उमेदवारा मागे ५० हजार ते ३ लाख रुपये घेतले,गोरगरिबांच्या लेकरांना सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून, भूलथापा देऊन फसवणाऱ्या या मध्यस्थींनाही योग्य शिक्षा झाली पाहिजे असे मध्यस्ती मध्ये बच्छाव, मोरे, देवरे व इतर अनेकांचा समावेश असल्याचे पीडित तरुणांनी सांगितले. गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये शेकडो अन्यायग्रस्तांनी वेगवेगळ्या माध्यमांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटून शासनामार्फत हे प्रकरण लवकर निकाली काढावे यासाठी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना फक्त अपमान व हेळसांड सहन करावी लागली.स्थानिक लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक सुरुवातीपासूनच या प्रकरणांमध्ये दुर्लक्ष करत आहे यामधील मुख्य आरोपी व मध्यस्थी नेत्यांचे जवळचे कार्यकर्ते  असल्यामुळेच लोकप्रतिनिधी त्यांना नेहमी पाठीशी घालून वाचवत असल्याची शंका अनेकांनी उपस्थित केली.तसेच सदर प्रकरणाचा तपास नाशिक पुरताच मर्यादित होता जर या घोटाळ्याचा खोलवर तपास झाला असता तर तत्कालीन महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या लोकांची नावे येण्याची शक्यता होती त्यामुळेच घोटाळा उघडकीस आल्यापासूनच स्थानिक पातळीवर दबाव तंत्राचा वापर होत असल्याची चर्चा नाशिक जिल्ह्यात आहे.

कोट :- माझे वडील एक साधारण चहाची टपरी चालवतात आमचे नातेवाईक कैलास बच्छाव हे एके दिवशी आमच्या घरी आले आणि माझ्या आईंना सांगितलं की मी माझ्या मुलाला सरकारी नोकरी लाऊन दिली आहे जर तुमच्या मुलाचे सरकारी नोकरीचे करायचं असेल तर माझे मोठे बंधू मधुकर बच्छाव यांच्याशी बोलून घ्या पीडब्ल्यूडी चे शेवाळे साहेब त्यांच्या खूप जवळचे आहे.माझ्या आई वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून घेतलेला प्लॉट सोनाराकडे गहाण ठेवून व आईचे सोने विकून आणि ते पैसे भूषण शेवाळे यांना मधुकर बच्छाव यांच्या घरी देण्यात आले.त्यानंतर कनिष्ठ लिपिक म्हणून काही दिवसांनी मला नियुक्तीपत्रही देण्यात आले परंतु काही महिन्यांमध्येच हे सर्व फ्रॉड आहे असे आमच्या निदर्शनात आले.
- श्रीराम साहेबराव महाले - मालेगाव

कोट -  मी मधुकर बच्छाव यांच्या घरी गेलो तिथे कामासाठी शैक्षणिक कागदपत्रे व पैसे दिले.त्यानंतर माझी मधुकर बच्छाव यांनी भूषण शेवाळे यांच्याशी भेट घालून दिली उर्वरित रक्कमही वेळोवेळी मधुकर बच्छाव व भूषण शेवाळे यांच्या घरी दिल्यानंतर १२/०९/२०१४ ला मला सीनियर क्लर्क चे नियुक्तीपत्र देण्यात आले. माझ्या निवृत्त प्राध्यापक वडिलांनी दहा लाख रुपये मध्यस्ती मधुकर राजाराम बच्छाव यांच्यामार्फत भूषण शेवाळे यांना दिले होते.आज रोजी ही मी व माझे कुटुंबीय या मानसिक आघातातून बाहेर पडलेलो नाही.
राज कुवर - मालेगाव नाशिक

कोट :- मी माझी शेती व घर विकून दहा लाख रुपये पीडब्ल्यूडी च्या नोकरीसाठी भूषण शेवाळे यांना दिले होते परंतु माझी फसवणूक झाली, माझा संसार मोडला माझी पत्नी मला सोडून गेली माझे संपूर्ण जीवनच उध्वस्त झाले ,मी आज मिळेल तिथे काम करून उदरनिर्वाह करत आहे, माझ्याकडे आत्महत्या शिवाय पर्याय उरलेला नाही, आरोपींची जमा केलेली प्रॉपर्टी विकून आम्हाला आमचे पैसे लवकरात लवकर मिळावे, उर्वरित आयुष्य जगण्यास सहाय्य होईल.
मंजीत पोद्दार - शिउड, धुळे



Most Popular News of this Week