Breaking News

विभागीय आयुक्त कार्यालय , कोकण विभाग,पनवेल महापालिका व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून योग दिन उत्साहात साजरा

विभागीय आयुक्त कार्यालय , कोकण विभाग,पनवेल महापालिका व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून योग दिन उत्साहात साजरा

पनवेल : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालय , कोकण विभाग, पनवेल महानगरपालिका व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून आज जेष्ठ नागरिक सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षकांनी यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योगासनाचे विविध प्रकार आणि प्राणायमासाठी मार्गदर्शन केले.  

      यावेळी  उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, कोकण विभागाचे महसूल उपायुक्त मकरंद देशमुख, मुख्य लेखा परिक्षक  निलेश नलावडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहाय्यकआयुक्त डॉ.वैभव विधाते, मुख्य  वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी, प्रभाग , महसूल विभागाचे अधिकारी आणि महापालिका अधिकारी ,कर्मचारी मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते.

      जगभरात 21 जून हा आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालय , कोकण विभाग,पनवेल महापालिका व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून योग दिन उत्साहात सकाळी 7.30 ते 8.45  यावेळेत साजरा करण्यात आला. यावेळी  आर्ट ऑफ लिव्हिंगच्या डॉ. लीना भापकर यांनी अधिकारी आणि कर्मचारी  वर्गाला भुंजगासन, ताडासन, धनुरासन, त्रिकोणासन, सर्वांगासन, वृक्षासन असे योगासनांचे विविध प्रकार शिकविले, तसेच त्याचे शरीराला होणारे फायदे सांगितले. याचबरोबरच प्राणायम, कपालभाती ,ध्यान कसे करावे हे सांगून त्याचे प्रत्यक्षिक घेतले. त्यांचबरोबर योगाचे उपयोग सांगितले. या कार्यक्रमासाठी आर्ट आफॅ लिव्हिंगच्या अविनाश पुरूशे, नरेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले.

तसेच महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळांमध्येही  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग विषयक कार्यक्रम घेण्यात आले.


Most Popular News of this Week