Breaking News

नवी मुंबई पोलिसांनी केलेली आरटीओ अधिकाऱ्याची अटक बेकायदेशीर - सत्र न्यायालय सत्र न्यायालयाचा नवी मुंबई पोलिसांना दणका

नवी मुंबई पोलिसांनी केलेली आरटीओ अधिकाऱ्याची अटक बेकायदेशीर - सत्र न्यायालय सत्र न्यायालयाचा नवी मुंबई पोलिसांना दणका

नवी मुंबई :- नागपूर येथील आरटीओ अधिकारी उदयसिंह पाटील यांना बेकायदेशीर वाहन नोंदणीच्या आरोपाखाली एपी एम सी नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली व अटक केल्यानंतर त्यांनी तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती.ती अटक सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्देशांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे करण्यात आल्यामुळे त्यावर आरटीओ अधिकारी उदयसिंह पाटील यांच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेत न्यायालयात नवी मुंबई पोलिसांचा डाव हणून पाडला.
            प्रथम वर्ग न्यायाधिश गवई यांनी सदर प्रकरणात पोलिसांच्या बेकायदेशीरपणावर कठोर ताशेरे ओढून पोलिसांची विनंती फेटाळून लावली आणि पोलीस कोठडी देण्यास नकार दिला.प्रथम वर्ग न्यायाधीश यांच्या आदेशानुसार आरटीओ अधिकारी उदयसिंह पाटील यांची अटक बेकायदेशीर होती हे सिद्ध झाले होते. प्रथम वर्ग  न्यायाधीश यांच्या या आदेशामुळे नाचक्की झाल्याने पोलिसांनी रिविजन द्वारे बेलापूर सत्र न्यायालयात त्या आदेशाला आवाहन दिले होते. पोलिसांच्या त्या  रिविजनवर  सुनावणी होऊन सत्र न्यायालयाने पोलिसांची याचिका फेटाळली आहे व आरटीओ अधिकारी यांच्यातर्फे दिलेला जामीन अर्ज मंजूर करून त्यांना जामीन दिला आहे. सदर प्रकरणात आरटीओ अधिकारी यांच्यातर्फे उच्च  व सर्वोच्च न्यायालयातील नामांकित वकील व सुप्रीम कोर्ट लायर्स असोसिएशन चे अध्यक्ष एडवोकेट ईश्वरलाल अग्रवाल आणि एडवोकेट तनवीर निजाम,एडवोकेट मीना ठाकूर ,एडवोकेट अभिषेक मिश्रा, ॲड दिपीका संदेश पाटील, ॲड सुषमा मयेकर, ॲड नितेश सोनावणे, ॲड भक्ती शिंदे, ॲड चेतना पाटील तसेच  बेलापूर कोर्टाचे ॲड मोरे पाटील या वकिलांनी काम पाहिले.सदर प्रकरणात संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयात याचीका दाखल असून सदर प्रकरणात पोलिसांनी या प्रकरणात आरोप पत्र दाखल करू नये असे आदेश करून आरटीओ अधिकाऱ्यांना दिलासा दिला आहे.या प्रकरणात आरटीओ अधिकाऱ्यांनी दोषी पोलिस अधिकारी विरुद्ध फौजदारी कार्यवाही करून प्रकरण सी.बी.आय कडे देण्याची विनंती केली आहे.या प्रकरणात आर टी ओ अधिकाऱ्यांना केवळ खंडणी वसुली करण्यासाठी शपथपत्रावर पोलिसांकडून अटक करण्यात आल्याचा आरोप आरटीओ अधिकारी यांनी केला आहे. त्यासंदर्भात उपलब्ध स्टिंग ऑपेरेशन ने दोषी पोलिसांची केलेली रेकॉर्डिंग सुद्धा उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ऍडव्होकेट तनवीर निजाम यांनी दिली.सदर प्रकरणात उच्च न्यायालयात  आर.टी.ओ अधिकाऱ्यांतर्फे एडवोकेट निलेश ओझा यांनी बाजू मांडली आहे व त्यांच्या सोबत एडवोकेट ईश्वरलाल अग्रवाल, ऍडव्होकेट तनवीर निजाम,एडवोकेट दीपाली ओझा ,एडवोकेट विजय कुर्ले,एडवोकेट घनश्याम उपाध्याय ,एडवोकेट मीना ठाकूर,एडवोकेट अभिषेक मिश्रा,एडवोकेट स्नेहल सुर्वे,एडवोकेट हनीया शेख,एडवोकेट मरिअम निझाम इत्यादी नामांकित वकील काम पाहत आहेत.



Most Popular News of this Week