Breaking News

कळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न , नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

कळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न , नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

नवी मुंबई :- महाराष्ट्र दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते कळंबोली, नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात आले. उपस्थित मान्यवर, नागरिक आदींना डॉ. कल्याणकर यांनी यावेळी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, विशेष पोलीस महानिरिक्षक कोकण परिक्षेत्र प्रविण पवार, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर आयुक्त किशन जावळे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलीस सहआयुक्त संजय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

                    यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस विभागात विविध ठिकाणी 24 वर्षे सेवेचा उत्तम अभिलेख राखलेले पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शंकरराव नाळे  यांना उल्लेखनीय सेवेबद्दल, नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय भिका चच्हाण यांना नक्षलवाद्यांना एन्काऊंटरमध्ये मारणे, जळगांव येथील दंगलीमधील गुन्हयांचा उत्कृष्ट तपास करणे अशा विविध उल्लेखनीय कामांबद्दल तसेच नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश हंबीरराव पाटील, पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश गोपाळ खांडेकर, एपीएमसी पोलीस ठाण्याचे पो.ह. जगदिश सुरेश पाटील,नवी मुंबई विशेष शाखेचे पो.ह.महेश पंढरीनाथ वायकर, तळोजा पोलीस ठाण्याचे पो.ह.विजय भागवत पाटील, गव्हाणफाटा वाहतूक शाखेचे पो.ह.लक्ष्मण श्रीरंग पवार, नवी मुंबई गुन्हे शाखेचे पो.ह. भानुदास बिरु मोटे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर  यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखा पथक,सिडको अग्निशमन दल पथक, नवी मुंबई पोलीस बॅण्ड पथक, याशिवाय अतिथी निरीक्षण वाहन, नवी मुंबई पोलीस श्वान पथक, बुलेट ब्रुफ वाहन, आर.आय.व्ही. वाहन, वज्र वाहन, बीडीडीएस वाहन, वरूण वाहन, अग्निशमन दल वाहन, आदिंनी संचलनाव्दारे प्रमुख अतिथी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.या कार्यक्रमास उपायुक्त (महसूल) मकरंद देशमुख, उपायुक्त (सामान्य), मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन निंबाजी गिते आणि शुभांगी पाटील यांनी  केले.


Most Popular News of this Week