Breaking News

लोअर परेलमध्ये सोळा मजल्याच्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, नऊ जण जखमी

लोअर परेलमध्ये सोळा मजल्याच्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, नऊ जण जखमी

मुंबई :  मुंबईतील लोअर परेलमध्ये लिफ्ट कोसळल्याची घटना घडली. सेनापती बापट मार्ग कमला मिल इथल्या ट्रेड वर्ल्ड इथे ही दुर्घटना घडली. सोळा मजल्याच्या या इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावरुन ही लिफ्ट खाली कोसळल्याची माहिती आहे. यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या ग्लोबल आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती स्थिर असून कोणीही गंभीर जखमी नसल्याची माहिती आहे.

लिफ्ट इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली

आज सकाळी 10 वाजून 49 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. ट्रेड वर्ल्ड मधील सी विंग मधील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर लिफ्ट कोसळली. यात 12 ते 14 जण जखमी झाले. सर्व जखमींना सुरक्षा पर्सनलद्वारे सुटका करण्यात आली. त्यापैकी 8 जखमींना ग्लोबल  रुग्णालयात (Global Hospital) पाठवण्यात आलं तर एका जखमीला केईएम हॉस्पिटलमध्ये (KEM Hospital) पाठवण्यात आलं. तर इतर चार किरकोळ जखमींनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला.


जखमींची नावं

प्रियंका चव्हाण (वय 26 वर्षे), प्रतीक शिंदे (वय 26 वर्षे), अमित शिंदे (वय 25 वर्षे),  मोहम्मद. रशीद (वय 21 वर्षे), प्रियांका पाटील (वय 28 वर्ष), सुधीर सहारे (वय 29 वर्षे),  मयूर गोरे (वय 28 वर्षे), तृप्ती कुबल (वय 46 वर्षे)  अशी जखमींची नावं असू सर्वांची प्रकृती स्थिर आहेत. त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर किरण विश्वनाथ चौकेकर (वय 48 वर्षे) या जखमीला केईएम रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.


Most Popular News of this Week

नवी मुंबई पोलिसांनी केलेली...

नवी मुंबई :- नागपूर येथील आरटीओ अधिकारी उदयसिंह पाटील यांना बेकायदेशीर वाहन...

ऐरोली व बेलापूर विधानसभा...

नवी मुंबई (योगेश महाजन) :- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला उत्तम यश...

सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी...

ठाणे : महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि प्रदुषण...

लफाट चाळीचा पुनर्विकासाचा...

ठाणे : खारटन रोडवरील लफाट चाळ धोकादायक झाल्यामुळे येथील नागरिकांचे...

‘हेल्थ हिरो’ होण्यासाठी...

नवी मुंबई :- ’स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये ’स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने ’सफाई...