Breaking News

पीडब्ल्यूडी वेब मॅनेजमेंट नोकर भरती घोटाळ्यातील तरुण न्यायाच्या प्रतीक्षेत, पीडब्ल्यूडी खात्यातील क व ड प्रवर्गातील नोकऱ्या लावून देण्याच्या नावाखाली करोडोंचा घोटाळा, स्वतंत्र खासगी पीडब्ल्यूडी वेब मॅनेजमेंट कार्यालय सुरु करून शासनाचीही फसवणूक

पीडब्ल्यूडी वेब मॅनेजमेंट नोकर भरती घोटाळ्यातील तरुण न्यायाच्या प्रतीक्षेत, पीडब्ल्यूडी खात्यातील क व ड प्रवर्गातील नोकऱ्या लावून देण्याच्या नावाखाली करोडोंचा घोटाळा, स्वतंत्र खासगी पीडब्ल्यूडी वेब मॅनेजमेंट कार्यालय सुरु करून शासनाचीही फसवणूक

पीडब्ल्यूडी वेब मॅनेजमेंट नोकर भरती घोटाळ्यातील तरुण न्यायाच्या प्रतीक्षेत
पीडब्ल्यूडी खात्यातील क व ड प्रवर्गातील नोकऱ्या लावून देण्याच्या नावाखाली करोडोंचा घोटाळा
स्वतंत्र खासगी पीडब्ल्यूडी वेब मॅनेजमेंट कार्यालय सुरु करून शासनाचीही फसवणूक

नाशिक (रेणुका महाले-गायकवाड) :- पीडब्ल्यूडी खात्यातील क व ड प्रवर्गात नोकऱ्या लावून देतो, त्याचबरोबर कंत्राटेही देतो,असे सांगून शेकडो तरुणांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यात उघडकीस आला आहे.या फसवणुकीला सात ते आठ वर्ष झाले असून अजूनही फसवणूक झालेल्या तरुण तरुणींना न्याय मिळालेला नाही.घोटाळेबाज आजही मोकाट असून गतिमान सरकार आम्हाला न्याय द्यायला पुढाकार घेईल काय असा प्रश्न आता शेकडो तरुण तरुणींना पडला आहे.
              मालेगावातील सवदगावात राहणाऱ्या भूषण गमनराव शेवाळे या व्यक्तीने ८ ते ९ वर्षापूर्वी मालेगाव नाशिक येथे पीडब्ल्यूडी खात्यातील इंजिनियर असल्याचे नागरिकांना भासऊन मालेगाव व आजूबाजूच्या परिसरामध्ये परिचय वाढवला. अनेक लोकांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या परिचयाच्या व नातेवाईकांच्या कुटुंबातील तरुण व शिकलेल्या मुला मुलींना पीडब्ल्यूडी खात्यातील क व ड प्रवर्गातील नोकऱ्या लावून देतो असे आमिष दिले. जास्तीत जास्त उमेदवार मिळावे म्हणून ज्यांच्या मार्फत उमेदवार येईल त्यांनाही पन्नास हजार ते दोन लाख प्रत्येक उमेदवार मागे कमिशन ठरवून दिले. त्यानंतर काही दिवसातच मालेगाव, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील गरजु उमेदवारांचे ओघ भूषण शेवाळे यांच्याकडे सुरू झाला.त्याचवेळी शेवाळे यांनी त्यांचा विश्वासू साथीदार ललित शेवाळे रा टेहरे - मालेगाव,या जोडीदारास बरोबर घेऊन त्याच्याच जमिनीवर उमेदवारांकडून मिळालेल्या पैशातून तीन मजली ऑफिस बांधले व हेच मालेगाव मधील पीडब्ल्यूडी चे वेब मॅनेजमेंट चे मुख्य कार्यालय आहे असे घोषित केले.नियुक्त केलेल्या उमेदवारांना इथे ट्रेनिंग दिले जाईल असेही उमेदवारांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले.सदर इमारतीमध्ये ४० च्या वर संगणकांचा सेट व लॅपटॉप बसवून ते शासकीय कार्यालयाचा सेट म्हणून तयार केला.कामगारांचा विश्वास वाढवा म्हणून माती परीक्षण व पाणी परीक्षण यासाठीही १००० स्क्वेअर फुट मध्ये लॅब उभारली,कोणाला संशय येऊ नये म्हणून भरती केलेल्या उमेदवारांना व टेंडर भरलेल्या कंत्राटदारांना एक- दोन महिन्याचे पगारही ही दिले ,नोकर भरती मार्फत मिळणारा पैसा प्लॉट, फ्लॅट, रो हाऊसेस, गाड्या व इतर स्थावर मालमत्ता घेण्यासाठी वापरले. पैसे दिलेल्या उमेदवारांना व त्यांच्या कुटुंबीयांना सदर नोकर भरती खरी वाटावे म्हणून त्यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना मेडिकल करायला लावणे पोलीस वेरिफिकेशन करायला लावणे असले प्रकारही सदर भूषण शेवाळे व ललित शेवाळे या जोड गोळीने केले.तत्कालीन पीडब्ल्यूडी चे मुख्य सचिव मुखर्जी व सचिव डेकाटे यांचे बनावट सही व शिक्के वापरून संबंधितांनी दीडशेच्या वर जणांना फसवले.चौकशीमध्ये भूषण शेवाळे यांनी आपल्या मूळ गाव सवदगाव, मालेगाव येथे घराजवळच लपवलेले बोगस शिक्के चौकशी दरम्यान पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मुख्य आरोपी भुषण शेवाळे व ललित शेवाळे व इतर दोन आरोपी यांनी नोकरी व पीडब्ल्यूडी च्या इतर विभागातील टेंडर देतो असे सांगून कोटींच्या घरात घोटाळा केला तसेच या घोटाळ्यामधून मिळालेल्या पैशाने त्यांनी अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता घेऊन ठेवल्या आहेत.यातील मुख्य सूत्रधार भूषण शेवाळे व ललित शेवाळे या जोडगोळीने भ्रष्टाचार करून मिळवलेल्या पैशातून खरेदी केलेली व नव्याने बनवलेली मालमत्ता विकून लोकांना पैसे द्यावे लागू नये व भ्रष्टाचारात मिळवलेली प्रॉपर्टी हातातून जाऊ नये म्हणून जाणीवपूर्वक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करने व कायद्याचे डावपेच खेळणे सुरु केले.त्यामुळे भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशाने बनवलेल्या मालमत्तांचा या प्रकरणाशी संबंधच नाही ती वैयक्तिक मालमत्ता आहे असे दाखवून ती वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न या सूत्रधारांचा सुरू असल्याची कुजबूज अन्यायग्रस्तांमध्ये आहे.परंतु अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांनी स्वतःचे घर, प्लॉट, शेती ,सोने विकून संबंधितांना नोकरीसाठी दिलेले पैसे परत करावे ही मानसिकता त्यांच्यात दिसत नाही.यापैकी काही जणांच्या कुटुंबातील निवृत्ती व्यक्तींनी आपल्या मुलासाठी स्वतःची संपूर्ण जमापुंजी या लोकांना दिली होती पण नोकरी तर मिळाली नाहीच परंतु मनस्ताप होऊन आयुष्य मात्र कायमची उध्वस्त झालेत. कायद्याच्या पळवाटेमुळे आजही करोडोंच्या घरात घोटाळे करणारे मोकाट फिरत आहे व त्यांना पैसे देऊन कंगाल झालेले लोक आजही त्यांना दिलेल्या पैशाचे व्याज भरून हाल आपेष्टांचे जीवन जगत आहे. शेकडो च्या वर अन्यायग्रस्तं असूनही संबंधितांना न्याय मिळावा म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधीं, आमदार, खासदार, जनतेचे कैवारी, सामान्य नागरिकांचे सरकार पुढाकार घेणार का अशी चर्चा सध्या नाशिक जिह्यात सुरु आहे.Most Popular News of this Week