Breaking News

जिल्हाधिकारी यांच्याकडून शहीद पोलिसांना अभिवादन

जिल्हाधिकारी यांच्याकडून शहीद पोलिसांना अभिवादन

रायगड : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी, जवानांना स्मृतिदिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावर आयोजित कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहिदांचे नातेवाईक उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ म्हसे यांनी देशभरात गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या  पोलीस अधिकारी, पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.  शहिदांना अभिवादन करण्यासाठी पोलीस दलातर्फे हवेत तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यावेळी विशेष पोलीस कवायतीचे संचलन राखीव पोलीस निरीक्षक श्री विजय बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. किरण करंदीकर यांनी केले.


Most Popular News of this Week