Breaking News

कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी; बृजभूषण सिंग यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी; बृजभूषण सिंग यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे निवर्तमान प्रमुख ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ७ जून रोजी ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांची भेट घेतली होती आणि आंदोलक कुस्तीपटूंना १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर पैलवानांनी आपले आंदोलन थांबवले होते.

ब्रिजभूषण शरण सिंह प्रकरणात दिल्ली पोलिसांचे पीआरओ सुमन नलवा यांनी सांगितले की, माजी WFI प्रमुखांविरुद्ध आयपीसीच्या कलम ३५५४, ३५४डी, ३४५ ए अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
अधिका-यांनी सांगितले की तपासादरम्यान, दिल्ली पोलिसांनी इतर पाच देशांच्या कुस्ती संघटना/फेडरेशनना पत्र लिहून सिंग यांनी केलेल्या लैंगिक छळाच्या कथित घटनांबाबत माहिती मागितली आहे, परंतु त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. उत्तर मिळाल्यानंतर पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, स्पर्धेचे फोटो आणि व्हिडीओ सामन्यादरम्यान कुस्तीपटू ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज इत्यादी उपलब्ध करवून देण्याची विनंती करणारी नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने १८० हून अधिक जणांची चौकशी केली आहे. पोलिसांचे पथक भाजप खासदार ब्रिज भूषण यांच्या उत्तर प्रदेशातील गोंडा येथील निवासस्थानीही गेले जेथे त्यांनी खासदाराचे नातेवाईक, सहकारी, घरकामगार आणि त्यांचे सहकारी यांचे जबाब नोंदवले.


Most Popular News of this Week