Breaking News

मानवी तस्करीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दीड हजार किमीचा प्रवास

मानवी तस्करीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दीड हजार किमीचा प्रवास

नवी मुंबई : मानवी तस्करी सारख्या गंभीर समस्येचा सामना करण्याच्या आणि या विरोधात जनजागृती करण्यासाठी ओएसिस इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने मुक्ती बाईक चॅलेंज २०२३ चे २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आयोजन केले होते. शुक्रवारी उशिरा ही राईड नवी मुंबई येथे दाखल झालीय शनिवारी सकाळी हे रायडर्स मुंबई येथे निघणार आहेत. यामध्ये बंगलोर ते मुंबई या मार्गावर दीड हजार किलोमीटरचा प्रवास केला. या राईडमध्ये परदेशातील रायडर्स देखील सहभागी होते. ही या संस्थेची सातवी राईड होती. ओएसिस इंडियाचे व्यवस्थापक श्री. विश्वास उदगीरकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, भारतामध्ये दुर्दैवाने दर ८ मिनिटामध्ये एक लहान मुलगा अथवा मुलगी हरवते. त्या पैकी अनेकांचा पत्ता नगात नाही. लहान मुलांची आणि महिलांची तस्करी चे प्रमाण भारता मधे प्रचंड वाढत आहे. याविरोधात जनतेमध्ये जागृती करण्यासठी ओएसिस इंडिया मुक्ती बाइक चॅलें या उपक्रमातून २०१७ पासून या गंभीर समस्येचे निराकरण करण्यात आघाडीवर आहे. या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात मानव तस्करी विरोधात जनजागृती करण्यात आली. यात आठ रायडर्सचा सहभाग होता. त्यातील चार परदेशातील आणि चार भारतातील रायडर्स होते. एकूण १५०० किलोमीरचा प्रवास करून अनेक शहर आणि ग्रामीण भागातून ही राईड करण्यात आली. तस्करी पीडितांना आवाज देण्याच्या सामायिक वचनबद्धतेने ह्या राईडचे आयोजन केले. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी बंगळुरू येथून सकाळी ८.३० वाजता या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ही राईड हसन, मंगलोर, उडुपी, कुमटा, बेळगाव, मिरज, पुणे या आव्हानात्मक मार्गाने करणेत आली आणि उद्या म्हणजेच ४ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येथे संपणार आहे. शनिवारी रात्री नवी मुंबईत दाखल झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ नोव्हेंबर रोजी शेवटचा कार्यक्रम ११ वा. वायएमसीए इंटरनॅशनल हाऊस, 18, वायएमसीए आरडी, मुंबई सेंट्रल, मुंबई, महाराष्ट्र 400008 येथे होणार आहे. बाईक राइड दरम्यान, क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बंगलोरचे सेंटर फॉर सोशल ऍक्शन या टीमने भारतातील तस्करीच्या कठोर वास्तवाबद्दल सर्वसामान्य जनता, महाविद्यालये, शाळा आणि विविध संस्थांना प्रबोधन करण्याच्या उद्देशाने प्रभावी पथनाट्य सादर केले.तस्करीची चिन्हे कशी ओळखावी आणि असुरक्षित महिला आणि मुलांचे संरक्षण कसे करावे याबद्दल देखील लोकांना जागृत करण्यात आले. मुक्ती, म्हणजे 'स्वातंत्र्य', हे ओएसिसच्या कार्यक्रमाच्या उद्दिष्टाचे प्रतीक आहे: तस्करीला बळी पडलेल्यांना आवाज देणे हा कार्यक्रमाच उद्देश आहे. या कार्यक्रमाद्वारे संकलित केलेला निधी ओएसिस इंडियाच्या महिला, मुले आणि अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांना सक्षम करण्यासाठी तळागाळातील प्रयत्नांमध्ये वापरला जाणार आहे अशी माहिती श्री. उदगीरकर यांनी दिली. 

रायडर्सच्या प्रतिक्रिया :

रिटा गटब्रलेत ह्या मुक्ति बाईक चॅलेंजच्या पहिल्यामहिला रायडर्स असून जर्मनी इथून आल्या आहेत. त्या म्हणाल्या की, राईडमध्ये भाग घेऊन खूप समाधान वाटले. मानव तस्करी बद्दल जनजागृती ही काळाची गरज झाली आहे.

विजय अंपय्या म्हणाले, मी सलग ५ वेळा मुक्ती बाईक चॅलेंजमध्ये सहभाग घेतला. या संवेदन विषयाची जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे हे या प्रवासातून जाणवले.


Most Popular News of this Week