Breaking News

BRS चा विठ्ठल पंढरपुरात दाखल,हजारो वारकऱ्यांचा BRS मध्ये प्रवेश , राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके नंतर अजून मोठे मासे लागणार गळाला ? , युती, महाविकास आघाडी सह इतर पक्षांना धक्का

BRS चा विठ्ठल पंढरपुरात दाखल,हजारो वारकऱ्यांचा BRS मध्ये प्रवेश , राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके नंतर अजून मोठे मासे लागणार गळाला ? , युती, महाविकास आघाडी सह इतर पक्षांना धक्का

नवी मुंबई :- तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ (बीआरएस) या राष्ट्रीय पक्षाने महाराष्ट्राच्या रणभुमीवरून २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून त्यांची सुरवात त्यांनी मंगळवारी पंढरपूरातून केली.संपूर्ण तेलंगणाचे मंत्रिमंडळ ६०० गाड्यांच्या ताफ्यासह सोमवारी पंढरपुरात दाखल होताच राजकीय वर्तुळात खळबळ माजली.राजकारणाच्या इतिहासात प्रथमच तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची रॉयल इंट्री बघून युती, महाविकास आघाडी सह इतर पक्षांच्या पायाखालची वाळूचं सरकली असल्याची चर्चा राज्यात आहे.राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेशानंतर अजून किती जण (बीआरएस) च्या गळाला लागणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

                     तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राष्ट्रीय पक्षाची घोषणा केल्यानंतर त्यांनी ‘तेलंगण राष्ट्र समिती’चे (टीआरएस) नाव बदलून ‘भारत राष्ट्र समिती’ (बीआरएस) केले. केसीआर यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी राष्ट्रीय स्तरावर भाजपविरुद्ध निवडणूक मैदानात उतरण्याच्या आपल्या योजनेची रूपरेषा सांगितली. हैदराबादमध्ये पक्ष मुख्यालयात मंत्री, खासदार, आमदार, आणि जिल्हा स्तरावरील समन्वयकांच्या बैठकीत राव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. एच. डी. कुमारस्वामी तसेच विदुथलरई चिरुथाइगल कात्चीचे प्रमुख थोल थिरुमवलवन उपस्थित होते. यानंतर त्यांनी राष्ट्रीय पक्षाच्या कामकाजाची सुरवात महाराष्ट्रातून केली असता केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन कामाला सुरवात केली.राजकीय परिस्थिती बघून भारत राष्ट्र समिती ताकदीने महाराष्ट्रात उतरली आहे. भाजपविरोधात एकत्र येणाऱ्या पक्षांमध्ये चंद्रशेखरराव हेही आघाडीवर होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना चंद्रशेखरराव यांनी त्यांचीही भेट घेतली होती. महाराष्ट्रात प्रतिसादही मिळत आहे.गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील भारत राष्ट्र समिती पक्षाच्या प्रथम सरपंच सुषमा विष्णू मुळे यांची सावखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाने सरपंच पदाचे पाहिले खाते उघडले आहे.अनेक आजी, माजी आमदार, इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केल्याने आजमितीस पक्षाची ताकद वाढली आहे.त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी पंढपुरात बीआरएस पक्षात प्रवेश केल्याने पक्षाला अजून बळकटी मिळाली.राज्यात तब्बल १० लाखाहून अधिक सभासद करण्यात पक्षाला यश आले असून २८८ विधानसभा मतरसंघात पक्षाकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.



Most Popular News of this Week