Breaking News

सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी मोहिम तीव्र 139 किलो प्लॅस्टिक जप्त

सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी मोहिम तीव्र 139 किलो प्लॅस्टिक जप्त

ठाणे : महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व ठाणे महानगरपालिका प्रदुषण नियंत्रण विभागामार्फत संपूर्ण ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लॅस्टिक बंदीबाबत आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 369 आस्थापनांना भेटी देवून 139.56 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून यापोटी एकूण 95 हजार 100 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
            ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समितीअंतर्गत 17 आस्थापनांना भेटी देवून 23 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 4 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कळवा प्रभाग समितीअंतर्गत 55 आस्थापनांना भेटी देवून 32.26 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 18 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.उथळसर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 30 आस्थापनांना भेटी देवून 10 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 7 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत 44 आस्थापनांना भेटी देवून 11 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 8 हजार 500 रु. इतका दंड वसूल करण्यात आला.वागळे इस्टेट प्रभाग समिती अंतर्गत एकूण 49 आस्थापनांना भेटी देवून 5 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 6 हजार 600 रु. इतका दंड वसूल करण्यात आला. लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत 18 आस्थापनांना भेटी देवून एकूण 7 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 3 हजार 500 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत एकूण 78 आस्थापनांना भेटी देवून 2.7 किलो सिंगल यूज प्लॅस्ट‍िक जप्त करुन एकूण 9 हजार रु दंड वसूल करण्यात आला. माजिवडा मानपाडा प्रभागसमिती अंतर्गत एकूण 78 आस्थापनांना भेटी देवून एकूण 48.6 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 38 हजार 500 रु. इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.सदरची कारवाई उपमुख्यस्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे ओमसत्यशिव परळकर, पंकज साळवे, सुनील जगताप, संजय साळवी, अमित मोते, स्वच्छता निरीक्षक अजय जगताप यांनी केली.सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबतची कारवाई नियमितपणे शहरात सुरू राहणार असून नागरिकांनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Most Popular News of this Week