Breaking News

पनवेल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची भेट

पनवेल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची भेट

पनवेल  : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शहबाज पटेल व त्यांच्या युवक शिष्टमंडळाने वाय बी सेंटर मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी पनवेल विभागातील असणाऱ्या समस्याचे निवेदन शरदचंद्र पवार यांना दिले. 


                 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शहबाज पटेल व त्यांच्या युवक शिष्टमंडळाने वाय बी सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबई येथे हज हाऊस काम संथ गतीने सुरु आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण पाठपुरावा करावा असे निवेदन शरद पवार यांना दिला. तसेच तळोजा, व्हाया पनवेल ते सी एस टी लोकल सुरु करण्यासाठीही प्रयत्न करावे अशी विनंती केली. यावेळी शरद पवार यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक सचिव चाँद मौला शेख, समशीर शेख, श्रेयश भावसर, अमीर खान, सलमान शेख, पराग लांडगे उपस्थित होते.


Most Popular News of this Week