Breaking News

पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचा निषेध

पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचा निषेध

पनवेल : सतत वादग्रस्त वक्तव्ये करणारे संभाजी भिडे गुरुजी यांनी थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वडील हे मुसलमान जमीनदार होते असे वादग्रस्त व्यक्तव्य केल्याने संताप व्यक्त होत आहे. सर्वत्र संभाजी भिडे यांच्या व्यक्तव्याचा निषेध करण्यात येत असून पनवेलमध्ये याचे पडसाद उमटत पनवेल-उरण महाविकास आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचा आज निषेध व्यक्त करून त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. 

               शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक असलेले संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी अमरावतीमधील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगल येथे आयोजित सभेमध्ये महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त विधान केले. करमचंद गांधी हे गांधीजींचे खरे वडील नसून ते मुसलमान जमीनदाराचे पुत्र आहेत. गांधीजींचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुसलमान पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही भिडे यांनी केला. त्यांच्या या व्यक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पनवेलमध्ये हि शेतकरी कामगार पक्ष कार्यालय येथे पनवेल-उरण महाविकास आघाडीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला काळे फासत त्यांच्या निषेधाची मागणी केली. तसेच मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, शिवसेना  जिल्हाप्रमुख शिरीष घरत, मा आमदार बाळाराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्य्क्ष व महविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, मा नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, काँग्रेस नेते आर सी घरत, राष्ट्रवादीचे सूरदास गोवारी, विजय मयेकर, काँग्रेसचे नंदराज मुंगाजी, प्रदीप ठाकूर, विश्वास पेटकर, सतीश मोरे, मा नगरसेवक रवींद्र भगत, गांगण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण घरत, मा नगरसेवक गणेश कडू, राजेश केणी यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Most Popular News of this Week