Breaking News

लोकसभा निवडणूक मतदान जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यामार्फत आवाहन

लोकसभा निवडणूक मतदान जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यामार्फत आवाहन

25 ठाणे लोकसभा निवडणूकीचे मतदान दिनांक 20 मे 2024 रोजी असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 14 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनाचे औचित्य साधून ऐरोली येथील बाबासाहेबांच्या स्मारकात अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते हे लक्षात घेऊन मतदानाविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली.

      नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्मारकाला भेट दिली असता निवडणूक मतदान विषयक प्रचाराचे काम करणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मतदान करण्याबाबत आवाहन करणारे समुह छायाचित्र काढून त्यांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार व श्री. शिरीष आरदवाड, शहर अभियंता श्री संजय देसाई, प्रशासन व निवडणूक विभागाचे उपायुक्त श्री शरद पवार, समाजविकास विभागाचे उपायुक्त श्री किसनराव पलांडे, परिमंडळ 1 चे उपायुक्त श्री सोमनाथ पोटरे, कार्यकारी अभियंता श्री. मदन वाघचौडे, श्री. अजय संखे व श्री. प्रवीण गाडे, ऐरोली विभाग अधिकारी श्री अशोक अहिरे, समाज विकास अधिकारी श्री. सर्जेराव परांडे, क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.


Most Popular News of this Week