Breaking News

रसायनी-पातळगंगा येथील स्मशानभूमीच्या झालेल्या दुरावस्थाची होत आहे डागडुजी

रसायनी-पातळगंगा येथील स्मशानभूमीच्या झालेल्या दुरावस्थाची होत आहे डागडुजी

रसायनी : रसायनी येथील पाताळगंगा नदीच्या किनारी रसेश्वर मंदिराच्या जवळ असणाऱ्या स्मशानभूमीची गेली काही वर्षापासून अत्यंत दुरावस्था झाल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. परंतु उशिरा का होईना येथील स्मशानभूमी सुस्थितीत होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रसायनी येथील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या रसेश्वर मंदिराजवळ पातळगंगा नदीच्या किनारी खूप जुनी स्मशानभूमी आहे यापूर्वी या स्मशानभूमीची देखभाल एचओसी लि. कंपनी करत होती परंतु एचओसी कंपनी डबघाईला गेल्याने कंपनीत प्रमाणे या स्मशानभूमीला उतरती कडा लागली एचओसी सर्व जागा बीपीसीएल ला हस्तांतरित केल्याने या जागेवर बीपीसीएल कंपनीच्या नवीन प्रकल्पाचे काम या भव्य दिव्य जागेवर युद्ध पातळीवर आज मीतिला सुरू आहे.जोपर्यंत एच ओसी कंपनी अस्तित्वात होती तोपर्यंत येथील स्मशानभूमीची देखभाल व डागडुजी एचओसी चांगल्या पद्धतीने हाताळत होती मात्र बीपीसीएल कंपनीचा प्रकल्प आल्यापासून सदर स्मशानभूमीकडे दुर्लक्ष झाल्याने या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली.स्मशान भूमीवरील पत्रे उडाले स्मशानभूमी सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली शिवाय सर्वत्र काळोख व अंधारमय वातावरण निर्माण झाल्याने या स्मशानभूमीला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. रसायनी- पातळगंगा हा रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो. औद्योगीकरणाबरोबरच शहरीकरण,नागरीकरण दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच आहे. रसायनी- पाताळगंगा परिसरात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून तसेच विविध राज्यातून नागरीक मोठ्या संख्येने उद्योग व्यवसायानिमित्ताने आले आहेत. असे असले तरी काही भागात सुविधांचा अभाव तितक्याच प्रमाणात जनसामान्य जनतेला भेडसावत आहे. या स्मशानभूमीत वावेघर,दापीवली,पराडे, खाणे आंबिवली आणि मोहोपाडा या परिसरातील मृत व्यक्तींचा अंतिम संस्कार पाताळगंगा स्मशानभूमीत केला जातो. परंतु गेल्या काही वर्षांपासून स्मशानभूमीची अत्यंत बिकट व दुरावस्था झाल्याने विविध वर्तमानपत्रातून पत्रकारांनी याविषयी आवाज उठवला होता मात्र याबाबत संबंधित प्रशासन उदासीन होते त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.मात्र अलीकडे या स्मशानभूमीची चांगल्या पद्धतीने वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यवस्थित रित्या डागडुजी करण्यात आली आहे.


Most Popular News of this Week