Breaking News

सिडको व नैना क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी सिडको सकारात्मक

सिडको व नैना क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी सिडको सकारात्मक

नवी मुंबई : सिडको व नैना क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्याच्या दृष्टिने सिडकोने केडाई एमसीएचआय, नवीमुंबईच्या विकासकांची बैठक आयोजित केली होती. विविध सोयी-सुविधा आणि धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत सकारात्मक पाऊले उचलले जातील असे आश्वासन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी विकासकांना दिले व खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
            उलवे येथील सेक्टर २६, २७, २८, २९ येथे भूखंड वाटप करुन चार ते पाचवर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनसुध्दा कोणत्याही सोयी-सुविधा दिलेल्या नाहीत. उलटपक्षी या ठिकाणी दगडांचे डोंगर अस्तीत्वात असल्याचे दिसून येते. याचे टेंडर काढण्यासाठी मोठा कालावधी गेला असून लवकरात लवकर त्याचे तोडकाम करुन भूखंडाचा ताबा देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली. यावर सिडकोकडून सांगण्यात आले की, सदर जागेवर प्रत्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांनी पहाणी दौरा केला असून ही कामे तात्काळ करणेबाबत यापूर्वीच आदेश देण्यात आलेले आहेत. जे भूखंड वाटप झालेले आहेत अशा जागेवर सर्वप्रथम तोडकाम करणेबाबत प्रकाश बाविस्कर यांनी केलेली विनंती मान्य करण्यात आली.वरील सेक्टर मधील काही ठिकाणी भूखंड वाटप करण्यात आले असून तेथे सिडकोकडून अद्याप जमीनीचे भूसंपादन करण्यात आलेले नाही. याकरीता सिडकोमध्ये पाठपूरावा घेणारी वेगळी डेक्स तयार करण्यात येऊन भूधारकांमार्फत चर्चा करुन प्रश्न सोडविण्याबाबत विनंती करण्यात आली. याबाबत सिडको सकारात्मक असल्याचे तसेच अशा भूधारकांना भूसंपादन झालेल्या क्षेत्रात नवीन भूखंड वाटप करण्यात येईल असे गोयल यांनी सांगितले.साडेबारा टक्के व साडेबावीस टक्के योजनेत अनेक वर्ष वाटपाचे कार्य सुरू असून ड्रॉ पध्दतीने भूखंड वाटप करण्याऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर पूर्वी भूखंड वाटप केले जात होते त्याचपध्दतीने वाटप करावे. व हा प्रश्न लवकर सोडवावा अशी विनंती प्रकाश बाविस्कर यांनी केली असता याबाबत व्यवस्थापकीय संचालक यांचे निदर्शनास आणून सकारात्मक दृष्टीने व लवकरात लवकर भूखंडवाटपाच्या उद्देशाने सिडकोकडून पाऊले उचलले जातील असे सांगण्यात आले.युडीसीपीआरच्या सर्व अटीशर्ती लागू करण्यासंदर्भात काही अडचणी असल्यास विकासकांनी विनंती केली की, वारंवार शासनाकडून स्पष्टीकरण न मागवता सिडकोच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अंमलबजावणी करावी अशी विनंती विकासकांनी केली असता याबाबत कोणत्या अटीशर्ती अडचणीच्या आहेत त्या सिडकोकडे सादर करण्याबाबत सिडकोकडून विकासकांना सांगण्यात आले.अंतिम नैना डीसीपीआर सिडकोच्या वेबसाईटवर पब्लिश करण्यात यावा अशी विनंती प्रकाश बाविस्कर यांनी केली असता सिडकोचे मुख्य नियोजनकार रविंद्र मानकर यांनी माहिती दिली की, माग़नीप्रमाणे १३७ क्रमांकावर हा डीसीपीआर अपलोड करण्यात आला असल्याचे सांगितले.नैनाच्या २३ गावे वगळता दुसऱ्या टप्प्यांत विकास आराखडयात जी आरक्षणे निश्चित करण्यात आलेली आहेत अशा जमिनींना टीडीआर पॉलीसीप्रमाणे टीडीआर दिला तरी नैनाच्या कोणत्याही क्षेत्रात हा समाविष्ट करण्याकरीता इमारतींची उंची शिल्लक नाही व या टीडीआरपेक्षा जमिनींची किंमत ही स्वस्त आहे. व जमीन खरेदी केल्यास स्वस्त दरातील हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट शक्य आहे. व टीडीआर घेतल्यास व्हर्टीकल डेव्हलपमेंट करावी लागते ही अत्यंत महागडी आहे. म्हणूनच नैनाक्षेत्रात टीडीआरला योग्य किंमत मिळणे शक्य नाही. हा टीडीआर देण्याऐवजी साडेबावीसटक्क्याचा भूखंड देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतल्यास जमीन मालकांचा प्रतिसाद मिळू शकतो असे विकासकांच्यावतीने सांगण्यात आले. अन्यथा सदर जमीनीवर अतिक्रमण होईल आणि वर्षानुवर्ष मोबदला न दिल्यामुळे जमीनमालकांवर अन्याय होईल असे विकासकांच्यावतीने सांगण्यात आले. तसेच २३ गावांनाच विकासकाम पूर्णत्वास नेण्याकरीता १५ ते २० वर्षापेक्षा जास्त कालाधवधी लागू शकेल म्हणून उर्वरीत क्षेत्रात येत्या १० वर्षात तरी सोयी-सुविधा देणे सिडकोला अशक्य आहे. म्हणून या क्षेत्राला सिडकोतून वगळण्यात यावे. कारण सिडकोला येथील विकास प्रत्यक्षात शक्यच नव्हता म्हणून येथील अनेक गावे सिडकोकडुन १० वर्षानंतर काढून इतर विकास प्राधिकरणांना वाटप करण्यात आले. ही बाब सिडकोच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या विषयावर सिडको अंतर्गत चर्चा करेल असे सांगण्यात आले.नैना क्षेत्रात खाजगी अनेक नगरवसाहती आहेत. या नगरवसाहतीमुळे अनेकांना घरे मिळाली असून शासकीय महसूल व सिडकोस मोठयाप्रमाणात आर्थीक लाभ होत आहे. व केंद्र व राज्यशासनाचे ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेच्या पूर्ततेमध्ये अत्यंत महत्वाचा वाटा आहे. स्थानिक प्राधिकरण म्हणून सिडकोला मोठयाप्रमाणात रक्कम प्राप्त होते. या अनुषंगाने सिडकोला विनंती करण्यात आली की, नैनाच्या दूसऱ्या टप्प्यांतसुध्दा सिडकोने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने रस्त्याचे भूसंपादन, बांधकाम, पाणी, बांधकाम परवानगी व इतर ना हरकत दाखले देणेबाबत मागणी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व सिडकोमध्ये आरक्षणाचे भूसंपादन करण्याबाबत समन्वय नसल्याने ही कामे करण्यास उशीर होत आहे. तो समन्वय ठेऊन मदत व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावर सिडकोचे मूख्य भूमी व भूमापनअधिकारी समाधान खटकाळे यांनी यापूढे तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.यानंतर सिडकोचे नवनिर्वाचित सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांचेकडे भेट घेवून क्रेडाई एमसीएचआयच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सिडकोबाबतच्या विकासकांच्या विविध समस्या अवगत करण्यात आल्या. व त्यांची आणि गणेश देशमूख यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी शासनातर्फे निवड झाल्याने स्वागत करण्यात आले.नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचेकडे बैठकीकरता केडाई एमसीएचआय, नवीमुंबई यांचेकडून बैठकीची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने व व्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशाने सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी ही बैठक आयोजीत केली. याप्रसंगी सिडकोचे मुख्य नियोजनकार रविंद्र मानकर, मुख्य अभियंता शिला करुणाकरन, वरिष्ठ नियोजनकार अनुपमा कनम, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी समाधान खटकाळे व असोसिएशनतर्फे अध्यक्ष मदन जैन, सचिव प्रकाश बाविस्कर, विकासक संतोष पाटील व इतर उपस्थित होते.


Most Popular News of this Week